web analytics
---Advertisement---

सेनापती बापट आयटीआयच्या नुतनीकरणासाठी विशेष बैठक : आमदार काशिनाथ दाते यांचे प्रयत्न फळास

On: Saturday, July 5, 2025 7:59 PM
---Advertisement---

सेनापती बापट आयटीआयच्या नुतनीकरणासाठी विशेष बैठक : आमदार काशिनाथ दाते यांचे प्रयत्न फळास

पारनेर :-  पारनेर तालुक्यातील बेरोजगारीच्या समस्येवर ठोस उपाययोजना म्हणून कुशलतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. सुपा, म्हसणे, भाळवणी, रांजणगाव गणपती व अहिल्यानगर औद्योगिक वसाहतींचा झपाट्याने होणारा विस्तार हा स्थानिक तरुणांसाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे. मात्र, या संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कौशल्य विकासाची गरज होती.

ही गरज ओळखून आमदार काशिनाथ दाते सर यांनी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री सन्माननीय ना. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पारनेर येथील सेनापती बापट औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांचे नुतनीकरण व विस्तारीकरण करण्याची मागणी केली होती.

आमदार दाते यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, याच संदर्भात संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक म्हणजे पारनेर तालुक्यातील तरुणांच्या उज्वल भविष्याची पायाभरणी ठरणारी असून, बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवण्याच्या दिशेने घेतलेले हे निर्णायक पाऊल आहे.

या बैठकीस आमदार काशिनाथ दाते यांच्यासोबत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, प्राचार्य मुकुंद महामुनी, इंजिनिअर सुरशे साहेब, अमोल मैड, प्रताप अंबुले, शिल्प निर्देशक दत्तात्रय शेरकर, असिस्टंट लेक्चरर शेखर कदम, दीपक सोनवणे सर, सौ. अश्विनी गागरे, सौ. आश्विनी बुरा, सौ. सुमैय्या रोटीवाले, राजेंद्र जैन, दत्तात्रय शिंदे, मनोज वाणी, संकल्प नेटके, सौ. विद्या नागरे व सौ. शिल्पकला बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली :

🔹 आयटीआय इमारतीचे नुतनीकरण व सुविधांची वाढ

🔹 आधुनिक अभ्यासक्रम व नवीन ट्रेड्स सुरू करण्याबाबतची कार्यवाही

🔹 औद्योगिक क्षेत्राशी अधिक समन्वय साधून प्रशिक्षण व नोकरी संधी उपलब्ध करणे

🔹 महिला प्रशिक्षणार्थींसाठी विशेष उपक्रम

या उपक्रमामुळे पारनेर तालुक्यातील हजारो तरुण-तरुणींना दर्जेदार व आधुनिक औद्योगिक प्रशिक्षण मिळणार असून, त्यांना स्थानिक उद्योगांमध्ये नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

“केवळ मागणी नव्हे, तर त्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहिल्यामुळेच आज हे शक्य झाले आहे,” असे आमदार काशिनाथ दाते यांनी सांगितले.

ही विशेष बैठक म्हणजे केवळ संस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात नव्हे, तर पारनेर तालुक्यातील बेरोजगारी नष्ट करण्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment