web analytics
---Advertisement---

सुजित झावरे पाटलांचा पुढाकार : पारनेरच्या पानंद रस्त्यांचा मार्ग मोकळा

On: Wednesday, September 17, 2025 7:16 PM
---Advertisement---

पारनेर :- पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून राज्यात ओळखला जातो. रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक कामे ह्या तालुक्यात होत असल्याने ग्रामीण विकासाला चालना मिळते. मात्र 2023-24 या आर्थिक वर्षात तालुक्यातील अनेक पानंद रस्त्यांची कामे सुरू असतानाच आमदार काशिनाथ दाते यांनी या कामांना अचानक स्थगिती घेतली होती. अचानक स्थगिती आदेश लागल्याने तालुक्यातील विकासकामे ठप्प झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पुढाकार घेतला. सातत्याने पाठपुरावा करत ग्रामीण भागाच्या व्यथा शासन दरबारी मांडण्याचे काम सुजित झावरे पाटील यांनी केले होते. याच संदर्भात मंगळवारी (दि. 16 सप्टेंबर) मुंबईत सुजित झावरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्याचा ठाम आग्रह त्यांनी धरला. सुजित झावरे पाटलांच्या या प्रयत्नांना यश मिळताच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी स्थगिती आदेश शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना पुन्हा गती मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या कामांचा मार्ग मोकळा झाला असून सुजित झावरे पाटील यांनी केलेला पाठपुरावा या कामांसाठी महत्वाचा ठरला आहे.

सुजित झावरे पाटील म्हणाले की, “पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची नितांत गरज आहे. स्थगितीमुळे स्थानिकांचे हाल होत होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नाला गांभीर्याने घेत त्वरित निर्णय दिला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आता ही कामे जलदगतीने पूर्ण होतील आणि ग्रामीण विकासाला चालना मिळेल.”

या निर्णयामुळे पारनेर तालुक्यातील सुमारे 200 कामांना गती मिळणार असून तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांच्या रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी खर्च होणार आहे. परिणामी स्थानिकांच्या प्रवासातील अडचणी दूर होऊन दळणवळण सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील नागरिकांनी सुजित झावरे पाटलांच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले असून, “हा निर्णय रोजगार हमी योजनेच्या कामांना नवी दिशा देणारा ठरेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी देईल,” असे मत व्यक्त होत आहे.

सुजित झावरे पाटील यांच्या पुढाकाराने पारनेरच्या पानंद रस्त्यांची वाट आता खऱ्या अर्थाने मोकळी झाली आहे, हे सुजित झावरे पाटलांच्या प्रयत्नांना आलेले यश तालुक्यातील ग्रामीण भागाला मजबूत रस्ते देण्यासाठी फायड्याचे ठरणार असून ग्रामीण भागातील जनतेत या निर्णयाने समाधानाचे वातावरण आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment