web analytics
---Advertisement---

“पाण्याची बचत न केल्यास पुढील पिढी माफ करणार नाही” :- सुजित झावरे पाटील

On: Monday, June 30, 2025 10:00 PM
---Advertisement---

“पाण्याची बचत न केल्यास पुढील पिढी माफ करणार नाही” :- सुजित झावरे पाटील

पारनेर :- तिखोल येथील लघुपाटबंधारे प्रकल्पातील तलाव क्रमांक १ पूर्ण क्षमतेने भरल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते जलपूजन सोहळा उत्साहात पार पडला. सुजित झावरे पाटील यांनी बोलताना जलसंधारण आणि पाण्याच्या शाश्वत वापराबाबत अत्यंत मार्मिक आणि जळजळीत भाष्य केलं. ते म्हणाले की, “पाणी म्हणजे संपत्ती आहे, आणि त्याचा अपव्यय म्हणजे भविष्यकाळावर आघात आहे. आज पाणी आहे म्हणून शेतकरी त्याचा बेसुमार वापर करतात. पण पाणी आटल्यावर पश्चाताप करून काही उपयोग नाही. पाण्याची बचत हीच पुढील पिढीला दिलेली खरी वारसा आहे.”

🛑 “काही पुढारी फक्त जलपूजन करतात, आमच्या कुटुंबाने आधी धरणे बांधली मग जलपूजन केलं”

सुजित पाटलांनी आपल्या भाषणात झावरे पाटील कुटुंबीयांचे जलसंपदेसाठीचे योगदान ठळकपणे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या कार्यकाळात पारनेर तालुक्याच्या जलसंपत्तीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. काळू मध्यम प्रकल्प ढवळपुरी, शिवडोह प्रकल्प वडझिरे, भांडगाव प्रकल्प, मांडओहोळ कॅनॉल अस्तरीकरण, पिंपळगाव जोगा चारी नूतनीकरण, निघोज येथील काळभुजा प्रकल्प, २०० हून अधिक पाझर तलाव यामुळे तालुक्याला पाण्याच्या बाबतीत मोठा आधार मिळाला.”

ते पुढे म्हणाले,

“या सर्व कामांचा लाभ आजही पारनेरच्या जनतेला मिळतो. त्यामुळे पाणी म्हणजे केवळ जलपूजनाचा विषय नाही तर तो नियोजन, विकास आणि संवेदनशीलतेचा विषय आहे.”

या जलपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती अरुणराव ठाणगे, पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब झावरे, माजी सरपंच भाऊसाहेब सैद, सरपंच भगवान वाळुंज, भिकाजी वाळुंज, संभाजी वाळुंज, दिलीप पाटोळे, शिवाजी ठाणगे, नागचंद ठाणगे, सुभाष ठाणगे, सोनू मंचरे, बाळासाहेब ठाणगे, अशोक ठाणगे, संकेत ठाणगे, महेश ठाणगे, अतुल ठाणगे, पपू ठाणगे, संदीप ठाणगे, योगेश ठाणगे, प्रतीक ठाणगे, शहाजी ठाणगे, विशाल ठाणगे, राघू ठाणगे, विजय ठाणगे, उत्तम साळवे, रामदास ठाणगे, भानुदास ठाणगे, प्रसाद झावरे यांच्यासह काकणेवाडी, वासुंदे, तिखोल व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुजित झावरे पाटलांनी केलेले भाषण हे केवळ एका जलपूजन सोहळ्यापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण समाजासाठी एक शिकवण देणारे ठरले. पाण्याचा नियोजनबद्ध वापर, संवेदनशीलता आणि भविष्यातील संकटांना ओळखून आजच उपाययोजना करण्याचा संदेश त्यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment