पारनेर तालुक्याचा आमदार शिवसेनेचाच होणार :- शिवसेना सचिव राम रेपाळे

On: Wednesday, April 8, 2026 4:08 PM
---Advertisement---

पारनेर तालुक्यात शिवसेनेच्या शाखा गावोगावी उघडण्यासाठी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी गावोगावी शिवसंपर्क अभियान राबविणार :- सुजित झावरे पाटील

पारनेर :- पारनेर तालुक्याचा आमदार शिवसेनेचा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि आमदार घेऊनच मी ठाण्याला शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला जाणार असे सुतोवाच शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी केले. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार व पारनेर तालुका पंचायत समिती सभापती हा शिवसेनेचाच करणार असल्याचे शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी सांगितले आहे. ते पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते.

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन करणे व बूथनिहाय शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते नेमणे व त्यांना प्रशिक्षण देणे हे पुढील काळातील शिवसेनेचे उद्दिष्ट आहे. तसेच याच माध्यमातून शिवसेना पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर व बूथनिहाय बळकट करण्यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे असल्याचे रेपाळे यांनी नमूद केले.

 

यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शिवसेना नेते सुजित झावरे पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, उपसंपर्कप्रमुख संजीव भोर, जिल्हा परिषद माजी सदस्य संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोर, युवासेना जिल्हाप्रमुख नितीन शेळके, ओबीसी जिल्हाप्रमुख खंडू भुकन, तालुकाप्रमुख अरुण ठाणगे, महिलातालुकाप्रमुख डॉ.कोमल भंडारी, कामगार सेना जिल्हाप्रमुख स्वप्निल घुले, सरपंच योगेश रोकडे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब माळी, जिल्हा संघटक संदीप कपाळे, अजित दळवी, कैलास कोठावळे, सुभाष वराळ, पारनेर तालुका संघटक बाळासाहेब ठुबे, रवींद्र पाडळकर, राजेंद्र शेळके, यांसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील यांनी सांगितले की, शिवसेना पक्षात प्रवेश केल्यापासून शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखविलेल्या विश्वासाने काम करण्याचे बळ मिळाले असून त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक प्रलंबित कामे करता आली आहेत. पारनेर शहराचा डीपीआर सारखे महत्वाचे काम झाल्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत व त्या पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण ताकद देत असल्याने प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सुजित झावरे पाटील म्हणाले.

तसेच जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच शिवसेना पक्ष हा तालुक्यातील प्रत्येक गावागावात, वाडी-वस्तीवर व घराघरात पोहचविण्यासाठी पक्षांसंघटना मजबूत करण्यासाठी गावं तिथे शाखा मोहीम शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आपण राबविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तसेच लवकरच तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेच्या अडिअडचणी सोडविण्यासाठी व सोयी सुविधासाठी काय काम करता येईल यासाठी शिवसंपर्क अभियान राबविणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.

🛑उबाठा शिवसेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियांका खिलारी शिवसेना शिंदे गटात

उबाठा शिवसेना महिला तालुकाप्रमुख प्रियांकाताई खिलारी यांचा शिवसेना(शिंदे गट)मध्ये प्रवेश केला असून त्यांची तात्काळ महिला उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या हस्ते व सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वात त्यांनी प्रवेश केला आहे.

🛑उबाठा शिवसेनेला बैठकीआधीच शोधावा लागणार नवीन पदाधिकारी

शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या उद्याच्या पारनेरमधील बैठकी आधीच महिलातालुकाप्रमुख प्रियांका खिलारी पक्ष सोडून गेल्याने शिवसेना उबाठाला नवीन महिला तालुकाप्रमुख शोधावा लागणार आहे.

अळकुटीच्या सरपंच व विद्यमान शिवसेना(शिंदे गट) तालुकाप्रमुख कोमलताई भंडारी यांच्यानंतर प्रियांकाताई खिलारी यांच्या प्रवेशाने शिवसेना शिंदे गटाला महिलांचे संघटन वाढविण्यासाठी आणखी एक महिला नेतृत्व मिळाले आहे. टाकळी ढोकेश्वर गटात सुजित झावरे पाटील यांना या प्रवेशाने फायदा होणार आहे.

🛑पारनेर तालुक्यातील अनेक पदाधिकारी करणार लवकरच शिवसेना पक्षप्रवेश

पारनेर नगरपंचायत मधील विद्यमान काही नगरसेवक तसेच पारनेर तालुक्यातील आणखीन उबाठा शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते करणार भविष्यात पक्षप्रवेश तसेच इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्तेही पक्षप्रवेश करणार असल्याचे शिवसेना नेते व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सुतोवाच केले आहे.

🛑शिवसेना कार्यकारणीचा विस्तार

शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या उपस्थितीत व हस्ते तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांना व उबाठा तसेच अन्य पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना शिवसेना कार्यकारिणीत संधी देण्यात आली असून या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत शिवसेना संघटना मजबूत करणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.

🛑शिवसेना पदाधिकारी म्हणून निवड झालेले पदाधिकारी

१) पारनेर नगर विधानसभा प्रमुख सुरेशशेठ पठारे
२) महिला जिल्हा उपप्रमुख प्रियंकाताई खिलारी
३) तालुका उपप्रमुख देवराम गोविंद लामखडे
४) तालुका उपप्रमुख संतोष ठकाजी गाढवे
५) ढवळपुरी जिल्हा परिषद गट प्रमुख स्वप्निल राहिंज
६) सुभाष किसन करंजुले तालुका उपप्रमुख
७) महेंद्र दशरथ पांढरकर शेतकरी सेना तालुका प्रमुख
८) विजय बाळासाहेब पवार युवासेना तालुका उपप्रमुख
९) प्रशांत भगवान रासकर तालुका उपप्रमुख
१०) मीना सुभाष यादव महिला तालुका उपप्रमुख
११) मंगल विलास शेंडकर महिला तालुका उपप्रमुख
१२) सारिका शिवाजी गलांडे आळकुटी गट महिला प्रमुख
१३) देवराम लामखडे तालुका उपप्रमुख
१४) गजानन सोमवंशी तालुका उपप्रमुख

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment