मांडवे खुर्द शाळेची गुणदर्शन स्पर्धेत हॅट्ट्रिक; सलग तिसऱ्यांदा यशाची परंपरा कायम

On: Wednesday, January 7, 2026 3:52 PM
---Advertisement---

 

काव्या जाधवने किशोर गटात प्रथम; गणेश आहेर बालगटात तृतीय

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

पारनेर/प्रतिनिधी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे खुर्दने तालुकास्तरीय गुणदर्शन स्पर्धेत पुन्हा एकदा उल्लेखनीय यश मिळवले आहे. सलग तिसऱ्या वर्षी शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली असून, विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने आयोजित या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी होतात. तालुक्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी यात सहभागी होतात.
या वर्षी शाळेचे इयत्ता तिसरीचे विद्यार्थी गणेश सचिन आहेर याने बालगटात तृतीय क्रमांक पटकावला, तर इयत्ता सहावीची काव्या रामदास जाधव हिने किशोर गटात प्रथम क्रमांक मिळवला. काव्या जाधवची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही शाळेसाठी अभिमानास्पद बाब आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कलश सीडस, जालना कंपनीचे अधिकारी दिनेश सारस्वत, श्रीपाल केंद्रे व सागर वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी लाळगे साहेब, विस्तार अधिकारी कांतीलाल ढवळे, टाकळी बिटचे विस्तार अधिकारी गवळी साहेब, केंद्रप्रमुख आंधळे साहेब, सरपंच कमलताई गागरे, उपसरपंच मनीषा जाधव, माजी सरपंच सोमनाथ आहेर, गौतम बागुल, रेवणनाथ गागरे, जगदीश पाटील गागरे, मंदाकिनी जाधव, पूजा गागरे, सागर पवार, मंगेश गागरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
हे यश विद्यार्थ्यांच्या परिश्रमाने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व पालकांच्या सहकार्याने मिळाले असून, शाळेची गुणवत्तापूर्ण परंपरा अधिक बळकट झाली आहे.

 

शाळेच्या विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी गुणदर्शन स्पर्धेत यश मिळवले आहे, याचा आम्हा ग्रामस्थांना खूप अभिमान आहे. गणेश व काव्या यांच्या मेहनतीमुळे शाळेची कीर्ती वाढली असून, शिक्षक व पालकांच्या सहकार्याने अशी यशाची परंपरा कायम राहील.

सोमनाथ आहेर (माजी सरपंच, मांडवे खुर्द)

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment