यशाचा मार्ग स्वतः शोधणे हेच खरे उत्कर्षाचे रहस्य : साहित्यिक मनोज बोरगावकर

On: Thursday, January 8, 2026 10:20 AM
---Advertisement---

निर्भीड पत्रकार पुरस्कार शशिकांत भालेकर यांना प्रदान

पारनेर प्रतिनिधी :

पारनेर महाविद्यालयात आयोजित पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मनोज बोरगावकर असे म्हणाले की. यशाचा मार्ग स्वतः शोधणे हेच खरे उत्कर्षाचे रहस्य आहे, आणि ते खरे आहे. खऱ्या जीवनाची ओळख ही दुःख समजण्यातून येते. देशाची संस्कृती ही वंचितांनीच जपली आहे, हे वास्तव अधोरेखित करताना त्यांनी सामाजिक वास्तवाकडे लक्ष वेधले. ‘गुरुजी’ हे पद हृदयातून येते, तर ‘सर’ हे केवळ वरवरचे असते, या सूचक विधानातून ते नात्यांच्या खोलीवर भाष्य करतात. पत्रकारितेतील पूर्वीच्या प्रामाणिकपणापासून आजच्या बदलापर्यंतचा प्रवास त्यांनी स्पष्ट केला. नव्या पिढीने हे लक्षात ठेवावे व साहित्याकडे वळावे, असा संदेश त्यांनी दिला.

 

पत्रकारितेत अनेक वर्ष विविध वर्तमानपत्रात काम करत असताना तालुक्यातील सामाजिक व राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण व निर्भीड लिखाण करणारे पत्रकार शशिकांत भास्कर भालेकर यांना सपत्नीक पारनेर येथे पडलेल्या राज्यस्तरीय अधिवाशनात निर्भीड पत्रकार पुरस्कार तसेच ग्रंथालय पुरस्कार विजय डोळ यांना सुप्रसिद्ध ज्येष्ठ कादंबरीकार मनोज बोरगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोरगावकर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

 

पारनेर येथे पत्रकार दिनानिमित्त न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर व पारनेर तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन पार पडले.

 

यावेळी अहिल्यानगर जिल्हा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे सहसचिव मुकेश दादा मुळे पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, माजी अध्यक्ष मार्तंडराव बुचुडे, विद्यमान अध्यक्ष उदय शेरकर, ज्येष्ठ पत्रकार विनोद गोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, प्राध्यापक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, डॉ रवींद्र देशमुख, डॉ हरीश शेळके, प्रा. माया लोहारे,

कार्यक्रमास पत्रकार विजय वाघमारे, शरद झावरे, भास्कर कवाद, शरद रसाळ, सनी सोनावळे, सुरेंद्र शिंदे, संतोष सोबले, अमोल खिलारी, श्रीकांत ठुबे, विशाल फटांगडे आदी उपस्थित होते.

 

पारनेर तालुका पत्रकार संघाची जिल्ह्यात आणि राज्यात एक वेगळी ओळख आहे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अनेक आंदोलनाची साक्ष हा पत्रकार संघ आहे त्याचबरोबर तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम संघातील पदाधिकारी सदस्यांनी केले आहे त्यामुळे तालुका पत्रकार संघाचा हा पुरस्कार मिळणं हा मी माझा सन्मान समजतो पत्रकार क्षेत्रात काम करताना अनेक मानसन्मान मिळतात परंतु पारनेर तालुका पत्रकार संघाने केलेल्या सन्मान हा आपल्याच माणसाने पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप आहे यातून अधिक काम करण्याची ऊर्जा मिळेल.

 

शशिकांत भालेकर (पुरस्कारार्थी, पत्रकार)

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment