पारनेर :- पाडळी तर्फे कान्हूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सौ.किर्ती राजाराम दावभट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे गावात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडप्रक्रियेवेळी जयसिंग दावभट (भाऊ), नितीनशेठ दावभट, योगेश दावभट, संतोष सुंबे, राजेंद्र दावभट, रामदास दावभट, संतोष पाडळे, अर्जुन शिंदे, सुभाष काळे, गंगाराम पोटघन, शुभम सिनारे, विकास शिंदे, नाना गेणु सुंबे, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप सिनारे, अशोक दावभट, पांडुरंग दावभट, संतोष सिनारे, उमेश दावभट, विजय सुंबे, नाना आबा सिनारे, दादाभाऊ सुंबे, निलेश सुंबे, संदीप पाडळे, मोहन वाबळे, पोपट सिनारे, भीमसेन गायकवाड, सर्जेराव दावभट, विजय अ. सुंबे, राहुल काळे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच इंदुबाई शंकर सिनारे, तसेच सदस्य मनिषा सुंबे, अंबिका दावभट, अलका सुंबे, सविता सिनारे, ठकाराम सिनारे, शिवाजी सिनारे, बाबासाहेब सुंबे, भाऊ शंकर सिनारे, रावसाहेब सिनारे, संदीप वलघुडे, शिवाजी दावभट यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणुकीचे संपूर्ण कामकाज ग्रामविकास अधिकारी तथा सचिव शेख मॅडम यांनी यशस्वीपणे पार पाडले.
या निवडीत स्वप्निल दावभट, सुनील अडसूळ, राहुल चिमाजी काळे (इंजिनिअर), विजय अंबादास सुंबे यांची खंबीर साथ लाभली.
🔴गावविकासासाठी ठोस नियोजन करणार
सौ.किर्ती दावभट यांनी याआधीही गावाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले असून, पुढील काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. गावातील रस्ते, गटारे व अंतर्गत पायाभूत सुविधा सुधारणा, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व पुरेशी व्यवस्था, स्वच्छता अभियान, कचरा व्यवस्थापन, महिला, युवक व शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ, आरोग्य, शिक्षण सुविधा अधिक सक्षम करणे, गावात सामाजिक सलोखा, शांतता व तंटामुक्त वातावरण राखणे, डिजिटल सेवा व पारदर्शक कारभारावर भर तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि सर्व सदस्यांना सोबत घेऊन पाडळी तर्फे कान्हूर गावाचा विकास नवे उंचीवर नेण्याचा विश्वास सौ.किर्ती दावभट यांनी व्यक्त केला आहे.







