जलसंधारण कामातून शेतीला मिळणार नवी उभारी :- सुजित झावरे पाटील

On: Thursday, May 7, 2026 9:25 PM
---Advertisement---

काटाळवेढा येथील पाझर तलाव खोलीकरण कामाचा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

“टाटा मोटर्स”, “नाम फाऊंडेशन” व “दैनिक सकाळ”च्या सामाजिक दायित्व निधीतून काम

पारनेर :- जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते काटाळवेढा येथील पाझर तलावाच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून “टाटा मोटर्स”, “नाम फाऊंडेशन” व “दैनिक सकाळ” वृत्तसमुहाच्या सामाजिक दायित्व निधीतून हे काम करण्यात येत आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

सुजित झावरे पाटील यांनी यावेळी “नाम फाऊंडेशन”चे सर्वेसर्वा प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे आभार मानले व कामाबाबत माहिती देत आणखीन कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली. तसेच प्रत्यक्ष कामाला भेट देण्याबाबत विनंती केली. त्यांनीही कामे पूर्ण झाल्यावर कामांना भेट देण्याचे आश्वासन दिले.

काटाळवेढा येथील सदर पाझर तलाव हा माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांच्या कार्यकाळात त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे साकार झाला होता. आता या तलावाच्या खोलीकरणाच्या कामामुळे जलसाठा क्षमता वाढणार असून शेतीसाठी वर्षभर पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. परिणामी परिसरातील शेती उत्पादन वाढीस चालना मिळणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.

यावेळी पुढे बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की, काटाळवेढा गावात थाळवाटी पाझर तलावासह अनेक जलसंधारण आणि पाणी अडवण्याचे प्रकल्प स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांच्या माध्यमातून व आपल्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहेत. भविष्यातही ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अशाच प्रकारची विकासकामे राबविण्यात येतील. तसेच ग्रामीण भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे जलसंधारणाची कामे ही काळाची गरज असून नागरिकांनीही यापुढील काळात पुढाकार घेऊन गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

सुजित झावरे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, गावातील रस्त्यांची कामे, वाडी-वस्त्यांवरील कच्चे रस्ते पक्के करणे, सभामंडप उभारणी तसेच नागरिकांच्या विविध मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती सर्व विकासकामे प्राधान्याने करण्यात येतील.

यावेळी नाम फाऊंडेशनचे विशाल नगरे, टाटा मोटर्सचे प्रसाद जाधव, शिक्षक नेते अमोल साळवे, सोपानराव गुंड, खंडू भाईक, सुदाम गाजरे, अजित भाईक, लक्ष्मण गुंड, सचिन पवार, बाबाजी गाजरे, संजय गुंड, अर्जुन गाजरे, बाबाजी गुंड, रामदास भाईक, भाऊसाहेब गुंड, बाळू भाईक, गेणुभाऊ भाईक, संपत पवार, अनिल भाईक, शरद गगे, सोपान डोंगरे, बाबाजी भाईक, गणेश गाजरे, भाऊसाहेब गुंड, शंकर भाईक, भानुदास भाईक, बाबाजी गाजरे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितीत होते.

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment