पारनेर :- पारनेर तालुक्यात इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना गती देत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सुमारे 600 महिला व पुरुष कामगारांना प्रमाणपत्रांचे वितरण शिवसेना नेते तथा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमावेळी उपस्थित लाभार्थ्यांना मंडळाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नोंदणीकृत कामगारांना मिळणाऱ्या सुविधा, अर्ज प्रक्रिया आणि योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रमाणपत्रामुळे कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
यावेळी बोलताना यांनी सांगितले की, पारनेर तालुक्यातील आणखी हजारो महिला कामगारांना या योजनेचा लाभ देण्यासाठी काम सुरू असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी या योजनांचा व्यापक वापर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या योजनेची व्याप्ती आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या योजनेत येणाऱ्या त्रुटी बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर निवेदन देऊन या योजनेत जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून भविष्यात शिवसेना पक्ष यासाठी कायम कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन सुजित झावरे पाटील यांनी केले. तसेच जास्तीत जास्त कामगारांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी तालुक्यातील विविध भागांत विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांमार्फत गावोगावी याबाबत जागृती करणार असून या माध्यमातून योजना तळगाळात पोहचवीणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे पारनेर तालुक्यातील बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळण्यास मदत होणार असून, विशेषतः महिला कामगारांच्या सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. तसेच जास्तीत जास्त कामगार या माध्यमातून सक्षम होणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
यावेळी पारनेर तालुका महिला अध्यक्ष कोमलताई भंडारी, जिल्हा उपप्रमुख प्रियंकाताई खिलारी, उपतालुका प्रमुख मंगलताई शेंडकर, सरपंच विमलताई झावरे, रणजित काका पाटील, सूर्यभान भालेकर, स्वप्निल राहिंज, दिलीप पाटोळे शंकर बर्वे, बाळासाहेब शिंदे, संदीप भंडारी, लक्ष्मण झावरे, मारुती उगले, बाळासाहेब झावरे, प्रसाद झावरे, चिमाजी वाळुंज, रेश्मा राजे, तोसिफ राजे, पोपटराव झावरे, प्रसाद झावरे, अशोक चेमटे, मान्यवर मंडळी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.







