सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सारोळा आडवाई (रानमळा) येथे साठा बंधाऱ्याचे भूमिपूजन उत्साहात

On: Tuesday, February 24, 2026 1:13 PM
---Advertisement---

पारनेर :- सारोळा आडवाई(रानमळा) येथे जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या साठा बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.

या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असून भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः पावसाळ्यातील पाणी साठवून ते उन्हाळ्यात उपयोगात आणण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील यांनी सांगितले की, “शेतीचा विकास हा पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे अशा साठा बंधाऱ्यांच्या माध्यमातून गावागावात जलसंधारणाची कामे राबविणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अरुणराव ठाणगे, संदीप कपाळे, भाऊसाहेब चौधरी, शुभम चौधरी, शाखा अभियंता सचिन रामदीन, नानाभाऊ फंड, उत्तम महांडुळे, बाबाजी महांडुळे, नंदू फंड, भाऊसाहेब महांडुळे, बन्सी महांडुळे, बबन रोकडे सर, अरुण फंड, अशोक आबुज, रमेश आबुज, लहानु शिंदे, दत्तात्रय महांडुळे, सतीश महांडुळे, शारदा शिंदे, चंद्रकला महांडुळे, उज्ज्वला महांडुळे, महेश शिंदे, स्वप्निल शिंदे, ऋषिकेश महांडुळे, अमोल शिंदे, ऋषिकेश शिंदे, आदिनाथ महांडुळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंधाऱ्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन पीक उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. परिसरातील पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावणार असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

या साठा बंधाऱ्यामुळे सारोळा आडवाई (रानमळा) परिसरातील शेतीला नवी उभारी मिळणार असून जलसंधारणाच्या चळवळीला अधिक बळ मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment