आठ संघांचा सहभाग; पद्मावती फायटर पुणेवाडी उपविजेते
पारनेर/प्रतिनिधी :
पठार भागावरील वडगाव दर्या (ता. पारनेर) येथे अंबिका क्रिकेट क्लबच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चषक क्रिकेट स्पर्धेचे २०२६ चे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळवली गेली, एकूण आठ संघांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
स्पर्धेत श्रीनाथ फायटर पानोली संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर पद्मावती फायटर पुणेवाडी द्वितीय, अंबिका फायटर्स वडगाव दर्या तृतीय आणि व्हिक्ट्री हंटर्स गणपती फाटा यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेला उद्योजक नितीन चोरडिया, डॉ. विठ्ठल गुंड, विश्वनाथ परांडे, दत्तात्रय गुंड यांचे प्रोत्साहन लाभले.
बक्षिस वितरण प्रसंगी युवा नेते व वडगाव दर्या ग्रामपंचायत सदस्य सुभाष परांडे, ज्येष्ठ नेते नामदेव परांडे, माजी सरपंच अर्जुन गुंड, चेअरमन पंढरीनाथ परांडे, उपसरपंच दत्तात्रय गुंड, संपत गुंड, सखाराम गुंड, अभी पारधी, शांताराम सोनवणे, सत्यवान गुंड, श्रवण पारधी, सिद्धेश गावडे, सागर परांडे, अनिकेत परांडे, निकेत पवार, शंकर गुंड, बाळासाहेब वाढवणे, बाळासाहेब परांडे, गोकुळ शिंदे, संतोष परांडे, पप्पू गावडे, संदीप गुंड, संकेत परांडे, अविनाश गुंड, बाल्या परांडे, सोमनाथ नवले, लहू पारधी, ज्ञानेश्वर परांडे (पीएसआय), नवनाथ भोसले, अक्षय पारधी, हर्ष पारधी, सतीश ठुबे, तुषार परांडे, भानुदास गुंड, गणेश गुंड, भाविक गुंड, तेजस कानवडे, शिवतेज गुंड, बाबू गुंड, सोन्या कानवडे, ओम गुंड, संस्कार परांडे, ललित पारधी, बबलू नवले, कृष्णा परांडे, अवधूत परांडे, यश गावडे यांसह सर्व तरुण वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्पर्धेचे नियोजन आदिनाथ परांडे, विशाल नवले, अनिकेत गुंड, बाबाजी परांडे यांनी पाहिले, तर सूत्रसंचालन नवनाथ सोबले यांनी केले. स्पर्धेने ग्रामीण भागात क्रिकेटच्या उत्साहाला चालना मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराज चषकासारख्या स्पर्धा ग्रामीण भागातील युवकांना क्रिकेटच्या मैदानावर आणण्याचे उत्तम व्यासपीठ ठरत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून अंबिका क्रिकेट क्लबचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यंदा आठ संघांनी सहभाग घेऊन स्पर्धेला उत्साहपूर्ण वातावरण दिले. श्रीनाथ फायटरच्या विजयाने तरुण खेळाडूंच्या मेहनतीचे चीज झाले. अशा स्पर्धा युवकांना व्यसनांपासून दूर ठेवून त्यांना खेळाकडे वळवतात. आयोजक, प्रायोजक व सर्व सहभागींचे अभिनंदन!
सुभाष परांडे (ग्रामपंचायत सदस्य वडगाव दर्या)







