रंगोत्सव सेलिब्रेशन: कलेचा जागतिक उत्सव पुन्हा सुरू!

On: Wednesday, January 7, 2026 3:50 PM
---Advertisement---

११ जानेवारीला १२४ केंद्रांवर आंतरराष्ट्रीय स्पर्धा; लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग

मुंबई/प्रतिनिधी :
रंगोत्सव सेलिब्रेशन ही संस्था २०१२ पासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कला स्पर्धांचे यशस्वी आयोजन करीत आहे. संस्थेचे संचालक श्री. संग्राम दाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १३ वर्षांत या स्पर्धांनी लाखो विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव दिला आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये १५ लाखांहून अधिक तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये २ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

या स्पर्धा केवळ भारतातच नव्हे तर दुबई, टांझानिया, भूतान, मलेशिया, टोकियो, मालदीव अशा अनेक देशांमध्ये आयोजित झाल्या आहेत. रंगोत्सव सेलिब्रेशन देशभरातील कलाप्रेमी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनली आहे, जे त्यांच्या कलेची ओळख जगभरात करून देते.
यंदा, २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय कला स्पर्धा भारतातील १२४ केंद्रांवर ११ जानेवारी रोजी आयोजित होणार आहे.

तर जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या विशेष केंद्रांवर १८ जानेवारी रोजी विशेष स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धांमध्ये रंगभरण, हस्ताक्षर, चित्रकला, अशा विविध श्रेणींचा समावेश असतो.
रंगोत्सवच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. संस्था कलेच्या महत्त्वाला अधोरेखित करून विद्यार्थ्यांना सृजनशीलतेने जगाकडे पाहायला शिकवते.

या स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थी आपली कला जगासमोर आणू शकतात. रंगोत्सव सेलिब्रेशन कलेच्या रंगांत रंगलेला हा उत्सव खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सण ठरला आहे.

चौकट :

रंगोत्सव सेलिब्रेशनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या मनातील सृजनशीलतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन देतो. गेल्या १३ वर्षांत लाखो मुले या व्यासपीठावर आपली कला जगासमोर आणली आहेत. आमचे ध्येय आहे की, प्रत्येक मुलाला कलेच्या रंगांत रंगता यावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि ते जगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील. रंगोत्सव हा केवळ स्पर्धा नव्हे, तर कलेचा उत्सव आहे जो मुलांच्या भविष्याला आकार देतो.

— श्री. संग्राम दाते, संचालक, रंगोत्सव सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment