web analytics
---Advertisement---

“जेव्हा प्रश्न होतो जटील” तेव्हा “जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात सुजीत झावरे पाटील”

On: Friday, August 15, 2025 9:30 PM
---Advertisement---

सुजित झावरे पाटील यांच्यामुळे गाजदीपूर गाव मुख्य प्रवाहात

पारनेर :- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ जवळील गाजदीपूर हे गाव देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अंतरामुळे आणि दुर्गम भौगोलिक स्थितीमुळे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कायमच दूर राहिले होते. रस्ते नसणे, पिण्याच्या पाण्याची टंचाई, शैक्षणिक सुविधा अपुऱ्या या सगळ्यामुळे गाजदीपूरचे नाव फक्त ‘दुर्गम गाव’ म्हणूनच घेतले जात होते. परंतु 2008 साली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या गावाचा विकासाचा प्रवास सुरू झाला. त्या काळात वन विभागाच्या अनेक बंधनांवर मात करत, नियम बाजूला सारून, गावाकडे जाणाऱ्या पहिल्या दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करून दिले. हा रस्ता गाजदीपूरच्या विकासासाठी पहिले पाऊल ठरले.

त्यानंतर सुजित झावरे पाटील यांनी चार शाळा खोल्या बांधून दिल्या, पाणीपुरवठा योजना राबवली, बंधाऱ्याची उभारणी केली आणि गावातील मुलांना व शेतकऱ्यांना सोयी-सुविधांचा लाभ मिळेल याची खात्री केली. या प्रयत्नांमुळे गाजदीपूर हळूहळू शैक्षणिक, दळणवळण इतर सुविधांच्या बाबतीत मुख्य प्रवाहात आले.

आज गावाच्या उर्वरित रस्त्यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. कोणी उपोषणाच्या मार्गावर जात आहे, कोणी निवेदनं देत आहे. मात्र प्रत्यक्ष कृती करून दाखवणारे सुजित झावरे पाटील पुन्हा एकदा या गावच्या विकासासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गाजदीपूरच्या उर्वरित रस्त्याच्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली असून, यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे अशा येथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की “आज ज्या काही गाजदीपूरला सोयी सुविधा मिळाल्या, त्या मुख्यत्वे झावरे पाटील कुटुंबाच्या प्रयत्नांमुळेच मिळाल्या आहेत. बाकी लोक केवळ घोषणाच करतात, पण प्रत्यक्षात काम करणारा नेता आमच्याकडे आहे आणि तो नेता म्हणजे सुजित झावरे पाटील.“

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment