सुजित झावरे पाटील यांची रक्षाबंधनानिमित्त ग्रामस्थांना अनोखी भेट
पारनेर :- गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला वडगाव सावताळ ते खामकर झाप (शिवडी मार्गे) रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या महत्त्वाच्या रस्त्याला मंजुरी मिळाली असून, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना अनोखी भेट म्हणून आज या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले.
भूमिपूजन सोहळा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते पार पडला. उद्घाटनानंतर प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली. या रस्त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुकर होणार असून, शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी अमोल साळवे, किसन धुमाळ, कैलास नऱ्हे, माजी सरपंच ज्ञानदेव शिंदे, चेअरमन शिवाजी रोकडे, राजेंद्र रोकडे, बाबासाहेब शिंदे, गोविंद रोकडे, कर्ण रोकडे, सखाराम भोपाळ, संदीप खंडाळे, दत्ता सरोदे, डी.पी. शिंदे, शरद कांडेकर, शिवाजी भनगडे, आप्पासाहेब रोकडे, गणेश जाधव, शरद रोकडे, सचिन रोकडे, खंडू कोळेकर, रभाजी रोकडे, बाबाजी रोकडे, ज्ञानदेव रोकडे, दगडू आहेर, वामन रोकडे, रंगनाथ काकडे, अशोक शेवते, सुरेश शिंदे, गणेश रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
“ग्रामस्थांनी अनेक वर्षे वाट पाहिलेला हा रस्ता आता लवकरात लवकर पूर्ण होईल. विकासकामांमध्ये वेळ न दवडता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे हीच माझी भूमिका आहे,” असे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले. त्यांनी ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानले आणि रस्ता निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
रस्त्याच्या डांबरीकरणामुळे प्रवास सुलभ होणार, वाहतुकीला वेग येणार आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. त्यांनी सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले. हा रस्ता परिसराच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, आर्थिक व सामाजिक विकासाला मोलाची चालना देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुजित झावरे पाटील यांनी भूमिपूजन केल्यानंतर या रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले असून नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना सुजित झावरे पाटील यांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. सुजित झावरे पाटील यांनी कार्यतत्परता काय असते हे या कामातून दाखवून दिले आहे. तसेच कामाचा झपाटा असावा तर सुजित झावरे पाटील यांच्या कामासारखा असावा अशा या भागातील नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.