web analytics
---Advertisement---

सरपंच मेजर राहुल गाडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात “एक कुटुंब – एक झाड” उपक्रम राबवला

On: Thursday, July 24, 2025 2:02 PM
---Advertisement---

ग्रामविकासासोबत पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश!

पारनेर :- कळस (ता. पारनेर) येथे विद्यमान आदर्श सरपंच मेजर राहुल जिजाबा गाडगे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून गावात सामाजिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. गावातील प्रत्येक कुटुंबाला एक आंब्याचे झाड भेट देण्यात आले. “एक कुटुंब – एक झाड” या संकल्पनेद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

उपक्रमामध्ये निघोज जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे नेते व शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासोबत माजी उपसरपंच भर्तरीशेठ काणे, विद्यमान उपसरपंच सौ. सविता गाडगे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब गाडगे, गारखिंडीचे सरपंच निवृत्ती चौधरी, तसेच कळस गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. भास्करराव शिरोळे म्हणाले, “मेजर गाडगे यांनी केवळ ग्रामविकासापुरते आपले कार्य मर्यादित ठेवले नाही, तर पर्यावरण रक्षणासाठीही विधायक पावले उचलली आहेत. गावाच्या भविष्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण योगदान ठरणार आहे.”

कार्यक्रमात गावातील अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडून सरपंच गाडगे यांच्या कार्यशैलीचे व नेतृत्वाचे कौतुक केले. झाडांचे वाटप करताना प्रत्येक कुटुंबाने त्या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. हा उपक्रम केवळ एक औपचारिकता न राहता गावासाठी एक चळवळ ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment