web analytics
---Advertisement---

पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत विशेष सभा

On: Tuesday, July 22, 2025 12:51 PM
---Advertisement---

२३ जुलै रोजी ‘इंदिरा भवन’, पारनेर येथे होणार आरक्षण सोडत विशेष सभा 

पारनेर :- पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सन 2025 ते 2030 या कालावधीतील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे. यासंदर्भात तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, पारनेर यांच्यावतीने अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या विशेष सभेचे आयोजन २३ जुलै २०२5 रोजी ‘इंदिरा भवन’, पारनेर पोलीस स्टेशन समोर, पारनेर येथे करण्यात आले आहे. या सभेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्ग यामधील सरपंच पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

🗓️ सभेचा तपशील पुढीलप्रमाणे:

➊ सभा क्र. १

  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग करिता  सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणे.

  • वेळ: दुपारी १२.०० वाजता

  • स्थळ: इंदिरा भवन, पारनेर पोलीस स्टेशन समोर, पारनेर

➋ सभा क्र. २

  • अनुसूचित जाती(महिला), अनुसूचित जमाती(महिला), नागरीकांचा मागास प्रवर्ग(महिला) व सर्वसाधारण प्रवर्ग(महिला) करिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करणे.

  • वेळ: दुपारी १.०० वाजता

  • स्थळ: इंदिरा भवन, पारनेर पोलीस स्टेशन समोर, पारनेर

या बैठकीस पारनेर तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार कार्यालयाने केले आहे. आरक्षण निश्चिती ही पारदर्शक व कायदेशीर प्रक्रियेनुसार करण्यात येणार आहे.

🟣 नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन

या विशेष आरक्षण सोडत सभेमुळे पारदर्शक व न्याय्य पद्धतीने सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार असल्याने ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे आरक्षण सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी लागू राहील व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे यास अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment