web analytics
---Advertisement---

स्वप्निल राहिंज यांची पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी सुरू; भाळवणी परिसरात जोरदार चर्चा

On: Monday, July 21, 2025 1:10 PM
---Advertisement---

पारनेर :- पारनेर तालुक्यातील राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू बनत असलेल्या भाळवणी परिसरात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर माळकुप गावचे सुपुत्र आणि उदयोन्मुख सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल राहिंज यांचे नाव जोरदार चर्चेत आहे.

स्वप्निल राहिंज हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, कृषी, व आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवकृपा परिवार या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब, शेतकरी, महिलांसाठी विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी ते कायम अग्रेसर आहेत. त्यांची जनसंपर्काची हातोटी, तरुणाईशी असलेली जवळीक आणि पारदर्शक विचारसरणी यामुळे त्यांच्याभोवती एका सक्षम नेतृत्वाचे वलय निर्माण झाले आहे.

♦️ पाठीमागे आहे कामांचा ठसा; पुढे आहे विकासाचा अजेंडा

स्वप्निल राहिंज हे सध्या माळकुप सहकारी सेवा सोसायटीचे संचालक म्हणून काम पाहत असून, त्यांच्या काळात संस्थेच्या आर्थिक शिस्तीबरोबरच शेतकऱ्यांसाठी विविध सवलती, मार्गदर्शन शिबिरे यामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली आहे. “मातीशी नाळ, विचारांशी प्रगल्भता” हे त्यांच्या कार्याचे ठळक वैशिष्ट्य आहे.

♦️ स्वप्निल राहिंज यांचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव चर्चेत का?

✅ जनसंपर्क व सर्वसामान्यांशी सुसंवाद: सतत जनतेत राहून त्यांच्याशी संवाद साधणारा चेहरा.

✅ संघटन कौशल्य: देवकृपा परिवाराच्या माध्यमातून अनेक उपक्रम यशस्वी करण्यात सहभाग.

✅ युवकांचा पाठिंबा: परिसरातील तरुणांचा विश्वासार्ह नेता म्हणून ओळख.

✅ प्रशासनाशी समन्वय: शासकीय योजनांचा लाभ गावपातळीपर्यंत पोहोचवण्याचा अनुभव.

✅ राजकीय मार्गदर्शन: जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे मार्गदर्शन लाभलेले नेतृत्व.

♦️ विरोधकांसाठी आव्हान निर्माण करणारे नाव

स्वप्निल राहिंज यांचे नाव जाहीर झाले नसले तरी त्यांचा वाढता प्रभाव, संघटित कार्यप्रणाली आणि गावोगाव असलेला संपर्क पाहता विरोधकांसाठी ते निश्चितच एक आव्हान ठरू शकतात. विशेषतः तरुण मतदार, महिला वर्ग, शेतकरी आणि सेवा संस्थांशी निगडित घटक यांच्यात त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

♦️ भविष्यातील दिशादर्शक नेतृत्व

भाळवणी परिसरात विकासाचा नवा अजेंडा, स्थानिक प्रश्नांवरील प्रामाणिक दृष्टिकोन आणि राजकीय संधींऐवजी जबाबदारीची भावना असलेले नेतृत्व म्हणून स्वप्निल राहिंज यांच्याकडे लोक बघत आहेत. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली, तर ती परिसरातील राजकीय समीकरणांना निश्चितच नवे वळण देईल.

♦️“लोकांच्या विश्वासाचे नेतृत्व पुढे यावे” – ग्रामस्थांची भावना

गावकरी, शेतकरी, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातून येणारी एकमुखी भावना म्हणजे “आम्हाला काम करणारे, हाताशी असणारे नेतृत्व हवे”. आणि ही गरज पूर्ण करणारे सर्वसमावेशक नाव म्हणजे स्वप्निल राहिंज, असे अनेक ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

आता येणाऱ्या काळात काय राजकीय घडामोडी घडतात आणि स्वप्निल राहिंज निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर होणारा शुभेच्छांचा वर्षाव आणि त्यातून दिसणारी त्यांची लोकप्रियता त्यांना निवडणुकीसाठी फायद्याची असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment