♦️प्रियंका खिलारी या सक्षम महिला नेतृत्वाला मिळतोय भक्कम पाठिंबा
पारनेर :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका खिलारी या आगामी पंचायत समिती निवडणुकीत रिंगणात उतरल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे प्रारूप गट-गण रचना जाहीर होताच अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, प्रियंका खिलारी यांचे नाव या निवडणुकीच्या चर्चेत आघाडीवर आहे.
✅ चार वर्षांची निष्ठा व सक्रीय योगदान
प्रियंका खिलारी या गेली चार वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पक्षात फूट पडल्याच्या काळातही त्यांनी पक्षाशी निष्ठा राखत काम सुरू ठेवले. महाविकास आघाडीच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके, तर विधानसभा माजी सदस्या राणीताई लंके या महाविकासआघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून काम केले होते. त्यामुळे पक्षांतर्गत तसेच महाविकासआघाडीतील इतर नेत्यांमध्येही त्यांचा विश्वासार्ह नेत्या म्हणून लौकिक निर्माण झाला आहे.
✅ टाकळी ढोकेश्वर गणात संपर्क मोहिमेला गती
सध्या प्रियंका खिलारी या टाकळी ढोकेश्वर गणातील जनसंपर्क मोहिमेला गती देत आहेत. स्थानिक महिला, युवक, आणि विविध सामाजिक घटकांशी गाठीभेटी, संवाद व कार्यकर्त्यांशी बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांना व समाजकार्यातील सक्रिय सहभागाला स्थानिक नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
✅ महिलांसाठी विशेष कामाचा आग्रह
राजकारणात सक्रिय असताना प्रियंका खिलारी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तालुकास्तरावर महिलांसाठी ठोस योजना, सक्षमता प्रशिक्षण, व स्वरोजगारासाठी सहकार्य, महिला बचत गटांना रोजगारासाठी प्राधान्य तसेच विद्यार्थिनींना योग्य सोयी सुविधा या बाबतीत त्यांनी विशेष काम केले आहे. त्यामुळे पंचायत समितीमध्ये त्यांना संधी मिळाल्यास महिला व बालकल्याण क्षेत्रात ठोस बदल घडवून आणण्याची आशा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.
✅ महाविकास आघाडीची जागावाटप आणि आरक्षणाचा मुद्दा
महाविकासआघाडीमधील समन्वयासाठी सध्या जागावाटपाची चर्चा सुरू होणे अद्याप बाकी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने टाकळी ढोकेश्वर गणाची जागा लढण्याची तयारी दर्शविली असून, महाविकासआघाडीतील नेत्यांनीही याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असे प्रियंका खिलारी यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे महिलांना ५०% आरक्षण असल्यामुळे व प्रियंका खिलारी या तालुकाध्यक्ष असल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.
✅ पुढील लढतीकडे सगळ्यांचे लक्ष
सध्या टाकळी ढोकेश्वर गणातून आणखी कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, तसेच महाविकासआघाडीचा अंतिम निर्णय काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, प्रियंका खिलारी यांनी आपली तयारी पूर्ण केल्याचे स्पष्ट केले असून, “एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून जनतेचा विश्वास जिंकत संपूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
राजकीय अनुभव, सामाजिक कार्य, व पक्षाशी निष्ठा या त्रिसूत्रीवर उभं असलेलं प्रियंका खिलारी यांचं नेतृत्व पंचायत समिती गणात महत्त्वाचं ठरणार आहे. टाकळी ढोकेश्वर गणातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हं असून, प्रियंका खिलारी यांचं नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आगामी काळात महाविकासआघाडीचा निर्णय, आणि उमेदवारी जाहीर होणे, यानंतर निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे.