✅ समाजातील सर्वच वर्गातील मिळणारा भक्कम पाठिंबा निवडणुकीत विजयी खेचणार..!
पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचे असणारे गाव म्हणजे कान्हूर पठार आणि त्याच गावचे खासदार निलेश लंके यांचे खंदे समर्थक उपसरपंच प्रसाद नवले आता पंचायत समिती निवडणूक लढाविण्यासाठी सज्ज झाले असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकासाठी प्रारूप गट व गण रचना जाहीर झाल्यावर पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण आरक्षण जाहीर होण्याअगोदर तापायला सुरुवात झाले असून इच्छुक उमेदवारांनी तातडीने गावोगावी संपर्क करायला सुरुवात केलेला आहे.
तालुक्याच्या राजकारणावर छाप सोडणारा पठार भाग व कान्हूर पठार परिसर निवडणुकीच्या धांदलित कुठेही मागे राहिलेला दिसत नाही. निवडणुकीच्या आखाड्यात आता कान्हूर पठार गावचे उपसरपंच प्रसाद नवले यांनी मारलेली उडी अजिबात अनपेक्षित नसून गावचे उपसरपंच पद मिळाल्यापासून त्यांनी पंचायत समिती गणात संपर्क वाढवला असून तरुण मित्र-मंडळींचा संपर्क त्यांची जमेची बाजू आहे. वडील व चुलते यांच्या अनेक वर्षांपासून कृषी व्यवसायातील संबंधही त्यांना उपयोगी पडणार असून शांत, संयमी, चाणाक्ष, मुरब्बी आणि वेळप्रसंगी आक्रमकपणा हे त्यांच्या नेतृत्वातील वैशिष्ट्ये या निवडणुकीत त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे.
✅ राजकीय घडामोडींमधील सक्रिय सहभाग
अतिशय कमी वयात समाजाशी नाळ जोडली गेल्याने खासदार निलेश लंके यांच्यासोबत समाजकारण करत राजकारणात उडी घेतलेले प्रसाद नवले अल्पावधित खासदार निलेश लंके यांच्या विश्वासू समर्थकांत ओळखू लागले आहेत. कान्हूर पठार व परिसरात नवले यांच्या कुटुंबाचे असलेले वलयं व जनसंपर्क खासदार निलेश लंके यांच्या प्रत्येक निवडणुकीत महत्वाचा ठरलेला आहे. खासदार लंके यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना काळातील दोन्ही लाटेत नवले यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली असून रात्रदिवस कोरोना सेंटरवर रुग्णांची सेवा केली होती. तरुण वयात समाजसेवच लागलेल वेडं त्यांना राजकारणात आपसुकच घेऊन आले. खासदार निलेश लंके यांनीही या तरुण नेतृत्वाला आकार देण्यासाठी जबाबदारीच पद देण्याचं ठरवलं व निलेश लंके प्रतिष्ठाणमध्ये महत्वाची जबाबदारी दिली.
✅ राजकीय परिपक्वतेचे ठळक दाखले
कान्हूर पठार ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आणि त्या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला व त्यांच्या पॅनलच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तालुक्यातील तरुणांच्या सुख-दुःखात व अडीअडचणीत धावून जाणारे प्रसाद नवले अल्पावधित तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. बाजार समिती निवडणुकीत खासदार निलेश लंके यांच्या शब्दाला मान देऊन माघार घेत मुरब्बी व चाणाक्ष राजकारण्याची झलक त्यांनी दाखवून दिली.
✅ गावाच्या विकासात कार्यतत्परता; विरोधकांचाही निर्णायक पाठिंबा
उपसरपंच पदी विराजमान झाल्यावर कान्हूर पठार सारख्या मोठ्या गावात विकासकामे करण्यात ते कोठेही कमी पडले नाहीत. खासदार निलेश लंके यांच्याकडे सातत्याने गावच्या विकासासाठी पाठपुरावा करत गावातील अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. गोरगरीब, वंचित, मागासवर्गीय व गरजू नागरिकांच्या हाकेला धावणारा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. कान्हूर पठार गाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने व पठार भागावरील अनेक गावांचा संपर्क याच गावाशी असल्याने परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रसाद नवले कायम अग्रेसर असतात.
गावात विरोधात निवडणूक लढलेला गटही प्रसाद नवले यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात उभा आहे, ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर गावाच्या विकासासाठी विरोधात लढलेल्या सदस्यांना एकत्र येण्याचे आवाहन करत खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी विरोधी गटाचे निवडून आलेले सदस्य प्रसाद नवले यांच्यासोबत एकत्र आले. आज त्या सदस्यांनीही प्रसाद नवले यांच्या पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारीसाठी अनुकूलता दर्शविली असल्याने गावातील सर्वच क्षेत्रातील मंडळींनी प्रसाद नवले यांच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
✅ पंचायत समिती निवडणुकीत विजयासाठी जुळून येण्यासारखी राजकीय समीकरणे
खासदार निलेश लंके यांच्या ताब्यात कान्हूर पठार पंचायत समिती गणातील १५ गावापैकी ११ ग्रामपंचायत व सेवा सोसायटीवर झेंडा आहे, याचा मोठा फ़ायदा प्रसाद नवले यांना होईल. तसेच विविध गावाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी प्रसाद नवले यांचा वैयक्तिक असणारा संपर्क व मैत्रीपूर्ण संबंध त्यांच्यासाठी महत्वाचे ठरणारे आहेत. तसेच घरच्या कृषी व्यवसायातील पठार भागावरील जनसंपर्कामुळे असलेले घरगुती संबंध याचा फायदा प्रसाद नवले यांना नक्कीच होईल.
✅ व्यवसायातून निर्माण झालेले आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध
कृषी क्षेत्राशी निगडित व्यवसाय वाडवडिलांच्या काळापासून असल्याने शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या वेदना ते लहानपणापासून जाणत आहेत. शेतकरी वर्गाचे अडीअडचणीतील हक्काचे कुटुंब असलेले नवले कुटुंब व त्या कुटुंबाचे संस्कार प्रसाद नवले यांच्यावर असल्याने ते कायम शेतकरी वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही असतात. शेतकऱ्यांच्या अडचणीत हक्काचा माणूस म्हणून प्रसाद नवले यांना ओळखले जाऊ लागले असून त्यांच्या कार्यतत्पर स्वभावाने त्यांची लोकप्रियता आपसूकच वाढली आहे.
✅ समाजातील सर्वच क्षेत्रातील वर्गाचा असलेला निर्णायक पाठिंबा
लहान-थोर, तरुण मंडळी, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, सुशिक्षित, नोकरदार अशा समाजातील सर्वच वर्गातून प्रसाद नवले यांच्या नावाला जोरदार पाठिंबा मिळत असल्याने येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या नावाची जोरदार मागणी होत आहे. आरक्षण जाहीर होण्याअगोदरच प्रसाद नवले यांच्या नावाची होणारी चर्चा सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली आहे. प्रसाद नवले यांनी निवडणूक लढण्यासाठी केलेली तयारी त्यांना फायदेशीर ठरणारी असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कसं लागणार हे नक्कीच आहे. खासदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमधील या युवा नेतृत्वाला संधी मिळणार का हे येणारा काळच ठरविणार असून या गटातील निवडणुकीत आणखी कोण उडी घेणार हे पाहणे आता आत्सुक्याचे ठरणार आहे.
✅ राजकारणा पलीकडे असणारा युवा, अभ्यासू, कार्यतत्पर चेहरा
प्रसाद नवले हे केवळ एक राजकीय चेहरा नाहीत, तर एक युवा नेतृत्वाची उदयाची दिशा आहेत. त्यांच्या सडेतोड स्वभावात माणूस जोडण्याची ताकद आहे, आणि त्यांच्या संयमी स्वभावात समस्या सोडवण्याचं कौशल्य आहे. यामुळेच आज प्रसाद नवले यांना संधी मिळावी अशी मागणी ग्रामीण भागातून जोरात उठत आहे.
✅ पठार भागाला दिशादर्शक नेतृत्व देण्यासाठी सज्ज असलेला कार्यकर्ता
कान्हूर पठार व परिसराला एका तरुण तडफदार नेतृत्वाची असणारी गरज प्रसाद नवले नक्कीच भरून काढतील अशी चर्चा सर्वच ठिकाणी होत आहे. या भागाला एक दिशादर्शक नेतृत्वाची गरज असून त्यासाठी सज्ज झालेला युवा नेतृत्व म्हणून प्रसाद नवले नक्कीच कार्य करतील असा समाजातील अनेक वर्गाला विश्वास असल्याचे दिसून येत आहे. पठार भागाच्या भविष्यासाठी, विकासासाठी, आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा असा एक नवा चेहरा पंचायत निवडणुकीत दिसणार का? हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट मात्र नक्की – प्रसाद नवले नावाचं वादळ राजकारणाच्या मैदानात येण्यासाठी सज्ज आहे..!