कासारे गावाच्या विकासासाठी भरीव योगदान
कासारे (ता. पारनेर) :- कासारे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभ कासारे येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यामुळे कासारे गावाचा धार्मिक, सामाजिक आणि भौगोलिक विकास नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या विशेष प्रसंगी श्री. बिरोबा देवस्थान व परिसरातील खालील विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले:
🔸 श्री. बिरोबा देवस्थान भक्तनिवास लोकार्पण – भाविक भक्तांना राहण्याची सोय होण्यासाठी उभारण्यात आलेल्या नव्या भक्तनिवासाचे लोकार्पण करण्यात आले.
🔸 श्री. बिरोबा देवस्थान संरक्षण भिंत लोकार्पण – देवस्थानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेची असलेली भिंत उभारून भक्तांच्या श्रद्धेचा मान राखण्यात आला.
🔸 निवडूंगेवाडी ते कासारे डोंगर घाट रस्ता सुशोभीकरण लोकार्पण – या रस्त्याच्या सुशोभीकरणामुळे घाटात येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांना सुखद अनुभव मिळणार आहे.
🔸 श्री. बिरोबा देवस्थान कार्यालय लोकार्पण – मंदिर व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कार्यालयाचे लोकार्पण करत प्रभावी व सुव्यवस्थित धार्मिक व्यवस्थापनाचा पाया घालण्यात आला.
🔸 कासारे ते पिंपळगाव रोठा घाट रस्ता सुशोभीकरणाचे भूमिपूजन – या रस्त्याच्या सौंदर्यीकरणामुळे क्षेत्राचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
या लोकार्पण समारंभासोबतच श्री. मुक्ताई देवी, श्री. यमाई देवी व श्री. महादेव मंदिर येथील कलशारोहण सोहळाही भव्यतेने पार पडला. धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात झालेल्या या सोहळ्याने उपस्थितांचे मन जिंकले.
याप्रसंगी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले, “कासारे गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. भविष्यातही श्री. बिरोबा देवस्थान व परिसराच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व योजना राबविल्या जातील.”
या कार्यक्रमाला कासारे व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये अरुणराव ठाणगे, अमोल साळवे, दिलीपराव पाटोळे, बाळासाहेब झावरे, सरपंच शिवाजी निमसे, उपसरपंच शैला घनवट, चेअरमन विश्वनाथ दातीर, माजी सरपंच धोंडिभाऊ दातीर, वसंतराव दातीर, उद्योजक धनंजय निमसे, महेंद्रजी रोकडे, बाबाजी दातीर, शंकरराव घनवट, प्रदीप साळवे, रमेश दातीर, लहू खरात, कुंडलिक झावरे, ह.भ.प. मुंडे महाराज, मारुती खरात, संतोष दातीर, गुरुजी, भाऊ खरात, भाऊ पानमंद, गोवर्धन खरात, मेजर बाळासाहेब दातीर यांच्यासह ग्रामस्थ, महिला भगिनी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे पार पडल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सुजित झावरे पाटील यांचे मन:पूर्वक आभार मानले. या कार्यक्रमामुळे धार्मिक, सामाजिक व भौगोलिक पातळीवर कासारे गावाची ओळख अधिक उजळली आहे.