web analytics
---Advertisement---

डॉ.सुजय विखे पाटील यांची नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सदिच्छा भेट; भाजपा संघटनेसाठी नव्या पर्वाची सुरुवात..!

On: Wednesday, July 9, 2025 5:21 PM
---Advertisement---

डॉ. सुजय विखे पाटील यांची नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सदिच्छा भेट; भाजपा संघटनेसाठी नव्या पर्वाची सुरुवात!

मुंबई (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांची खास सदिच्छा भेट खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुंबई येथे घेतली. पक्ष संघटनेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदाची सूत्रे स्विकारल्याबद्दल त्यांनी रवींद्र चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीत सौहार्दपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. राज्याच्या राजकीय घडामोडींवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या संवादाच्या माध्यमातून पक्ष संघटनेच्या आगामी दिशा आणि धोरणांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य परिषदेवर (२०२५-२८) सदस्य म्हणून निवड झाली असून, त्या निवडीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

“पक्षाचे कार्य व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांचे नेतृत्व अत्यंत प्रभावी ठरेल, असा माझा ठाम विश्वास आहे. कार्यकर्त्यांशी नाळ अधिक घट्ट करत संघटनेचा विस्तार करण्यासाठी त्यांच्या कार्यकौशल्याचा मोठा उपयोग पक्षाला होईल,” असे गौरवोद्गार यावेळी डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केले.

चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात भाजपा संघटना अधिक बळकट होईल आणि नव्या ऊर्जा व उत्साहाने पक्षकार्यात चैतन्य निर्माण होईल, असा विश्वास या भेटीतून अधोरेखित झाला.

या भेटीने राज्याच्या राजकारणात एक सकारात्मक संदेश गेला असून आगामी काळात पक्षाच्या कार्याची दिशा अधिक स्पष्ट आणि प्रभावी होईल, अशी आशा कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment