“गोरगरिबांच्या स्वतःच्या हक्काच्या घराच्या स्वप्नांना बळ :- सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नांना यश…!”
वासुंदे येथे ७९ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वाटप
वासुंदे (ता.पारनेर) | प्रतिनिधी :– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वासुंदे गावातील ७९गोरगरीब व गरजू लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. हे मंजुरी पत्र श्री.सुजित झावरे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून प्राप्त झाले असून, गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामस्थ, लाभार्थी व मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या अगोदरही या योजनेअंतर्गत ७७ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते. आता उर्वरित लाभार्थ्यांनाही ही योजना लाभली असून, घराचे स्वप्न बघणाऱ्या गोरगरीब कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
कार्यक्रमावेळी लाभार्थ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या सारख्या गोरगरीब, वंचित, मागासवर्गीय कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाच्या योजना श्री. सुजित झावरे पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूर होत आहेत. यामुळे आम्हाला जगण्यासाठी हक्काचं घर आणि नव्या जीवनाची दिशा मिळते आहे.”
सामाजिक बांधिलकीतून सक्रिय सहभाग
श्री. झावरे पाटील हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटत असून, गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम ते प्राधान्याने करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या केंद्र शासनाच्या योजनांचा ग्रामीण भागातील खऱ्या गरजूंना फायदा होतो आहे.