web analytics
---Advertisement---

भीषण अपघात! आढळगावजवळ दुभाजकाला धडकून दुचाकी पेटली; एका तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

On: Wednesday, July 2, 2025 1:14 PM
---Advertisement---

भीषण अपघात! आढळगावजवळ दुभाजकाला धडकून दुचाकी पेटली; एका तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

 

अहिल्यानगर: अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील आढळगावजवळ काल रात्री (मंगळवार, १ जुलै) एक भीषण आणि विचित्र अपघात घडला. दुभाजकाला धडकून दुचाकीने पेट घेतल्याने तांदळी दुमाला येथील दोन तरुण गंभीर जखमी झाले, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. MH 16 CJ 5658 या क्रमांकाची दुचाकी अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती. आढळगाव शिवारात रस्त्याच्या दुभाजकाला धडकून दुचाकीने तात्काळ पेट घेतला.

या अपघातात दुचाकीस्वार ऋषिकेश बाळू ठोकळ (वय २४) आणि कृष्णा ऊर्फ आदित्य संजय ठोकळ (वय २३, दोघे रा. तांदळी दुमाला, ता. नगर) हे दोघे गंभीर जखमी झाले. कृष्णा ऊर्फ आदित्य ठोकळ हा आगीत ८० टक्क्यांहून अधिक भाजल्याने त्याला तातडीने नगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ऋषिकेश ठोकळ याच्यावरही उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रोडवर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दुचाकीने पेट घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment