शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले..!
डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुक्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
पारनेर :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पारनेर तालुक्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नवे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. या निवडीमुळे पक्षाच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचे मत स्थानिक कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख संतोष येवले, शेतकरीसेना तालुकाप्रमुख किसन चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.
♦शेतकरीसेना उपतालुकाप्रमुख म्हणून पांडुरंग सुपेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
♦सोशल मीडिया गणप्रमुख (निघोज) पदाची जबाबदारी राहुल मोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
♦तालुका समन्वयक म्हणून मंगेश सालके पाटील यांची निवड झाली आहे.
♦तालुका सहसंघटक (पारनेर) पदावर किरण सुपेकर यांची निवड झाली आहे.
♦निघोज-अळकुटी गट विभागप्रमुख म्हणून हरिओम परंडवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
♦सोशल मीडिया गणप्रमुख (टाकळी ढोकेश्वर) म्हणून किरण फटांगडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
♦जालिंदर आढाव यांची शेतकरीसेना गणप्रमुख निघोज गण पदी निवड करण्यात आली आहे.
♦राहुल यादव यांची गणप्रमुख राळेगण सिद्धी गण पदी निवड करण्यात आलेली आहे.
♦भाऊसाहेब गाडगे यांची गणप्रमुख कान्हर पठार पदी निवड करण्यात आलेली आहे.
♦सुरेश बुचुडे यांची शेतकरीसेना विभागप्रमुख कान्हूर पठार गट पदी निवड करण्यात आलेली आहे.
♦अंबादास कणसे यांची शेतकरीसेना विभागप्रमुख सुपा गट पदी निवड करण्यात आलेली आहे.
या निवडी करताना पक्षशिस्त, कार्यक्षमतेचा अनुभव आणि सामाजिक बांधिलकी या निकषांवर विचार करण्यात आल्याचे तालुकाप्रमुख डॉ. पठारे यांनी सांगितले. तसेच पदाधिकाऱ्यांची काम करण्याची क्षमता पाहून अजून पदाधिकाऱ्यांच्या निवडी लवकरात लवकर करणार असल्याचेही डॉ.श्रीकांत पठारे यांनी सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले की, “आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक शिवसैनिकाने ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवायची आहे. आता सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. पक्षाचा झेंडा गावोगाव फडकवण्याचे आपले ध्येय आहे.”
या निवडीनंतर नविन पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळाल्याचे चित्र असून, पक्ष कार्यकर्ते आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे संकेत मिळत आहेत.