web analytics
---Advertisement---

कडूस जिल्हा परिषद शाळेचा आधुनिक शौचालय व जलशुद्धीकरण प्लांट लोकार्पण सोहळा संपन्न!

On: Tuesday, July 1, 2025 1:06 PM
---Advertisement---

कडूस जिल्हा परिषद शाळेचा आधुनिक शौचालय व जलशुद्धीकरण प्लांट लोकार्पण सोहळा संपन्न!

कंपनीच्या सीएसआर फंडातून शाळेला मिळाले आधुनिक सुविधा; सरपंच मनोज मुंगसे यांच्या हस्ते उद्घाटन

पारनेर :- पारनेर तालुक्यातील कडूस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आधुनिक शौचालय आणि जलशुद्धीकरण प्लांट उभारण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या उपक्रमासाठी कमिन्स इंडिया कंपनीच्या सी.एस.आर. (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून पंधरा लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. हा संपूर्ण उपक्रम पुणे येथील अ‍ॅटॉस प्रयास फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आला.

या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन कडूसचे सरपंच मनोज मुंगसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पूर्वीच्या आणि आताच्या शाळेतील फरक पाहता विकासाची दिशा निश्चितपणे बदलली आहे. या ज्ञानमंदिरासाठी भविष्यातही संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.”

ते पुढे म्हणाले, “ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेला सोलर प्लांट, पेव्हिंग ब्लॉक, इंटरअ‍ॅक्टिव्ह बोर्ड, व संगणक संच प्रदान करण्यात आले आहेत. तसेच लवकरच शाळेच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले जाणार आहेत.”

कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी आश्लेषा ताजणे, मुख्याध्यापिका जयश्री काळे, तसेच ग्रामपंचायत सदस्या राखीताई शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.

या प्रसंगी सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच मनोज मुंगसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या लोकार्पण सोहळ्यास उपसरपंच छाया रावडे, ग्रा.पं. सदस्या पूनमताई मुंगसे, मिनाताई मुंगसे, नारायण नरवडे, व्हाईस चेअरमन संजय मुंगसे, हेमंत रणशिंग, राहुल काळे, अशोक कणसे, शामकांत मुंगसे, विजय रावडे, पप्पू शेख यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सखाराम साठे यांनी केले, सूत्रसंचालन शिक्षक भाऊसाहेब गवळी यांनी तर आभारप्रदर्शन गंगाधर भालेराव यांनी मानले.

या उपक्रमामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेसंदर्भात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या असून, हा उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment