web analytics
---Advertisement---

सोबलेवाडी-बुगेवाडी येथे विजेच्या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण…

On: Tuesday, July 1, 2025 1:02 PM
---Advertisement---

सोबलेवाडी-बुगेवाडी येथे विजेच्या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण…

शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नावर सुजित झावरे पाटील यांचे निर्णायक कार्य…

सोबलेवाडी-बुगेवाडी (ता. पारनेर) येथे आज एक ऐतिहासिक आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण कार्यक्रम सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

शेतीसाठी आवश्यक असलेली वीज ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक बाब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोबलेवाडी, बुगेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांना वारंवार वीजपुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या अडचणींबाबत अनेक वेळा निवेदने, मागण्या, पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु समाधानकारक तोडगा निघत नव्हता.

यावेळी या परिसरातील विजेच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत सुजित झावरे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत अखेर ट्रान्सफॉर्मर मंजुरी आदेश मिळवले आणि ते आज कार्यान्वित करत शेतकऱ्यांच्या आनंदाला भरघोस उधाण आले.

🔴शेतकऱ्यांच्या अडचणीत धावून जाणारा नेता

या कार्यक्रमात बोलताना झावरे पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येला मी माझी समस्या मानतो. विजेचा प्रश्न हा केवळ एक तांत्रिक मुद्दा नसून शेतकऱ्याच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. आज हे ट्रान्सफार्मर कार्यान्वित करून विजेचा प्रश्न सुटला असला तरी भविष्यातही शेती, पाणी, रस्ते, शिक्षण अशा सर्व क्षेत्रांत शेतकऱ्यांसाठी माझे काम अविरत सुरू राहील.”

🛑 स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांमध्ये दाखल

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, पावसामुळे रस्ते खराब झालेले असून शेतांमध्ये चिखल साचलेला असतानाही झावरे पाटील यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी कोणतीही टाळाटाळ न करता स्वतः ट्रॅक्टरचे स्टीअरिंग हातात घेत गावात दाखल होणे, हे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरला. सुजित झावरे पाटील यांची अशी जमिनीशी नाळ जोडलेली पाहून “हा खरा शेतकऱ्यांचा नेता आहे” असे म्हणत उपस्थितांनी त्यांचे स्वागत करत अभिनंदन केले.

या लोकार्पण सोहळ्यास निलेश खोडदे, नवनाथ सोबले, सोपान कावरे, अविनाश औटी, सतीश म्हस्के, बाळासाहेब शेरकर, कुंडलिक कावरे, आप्पासाहेब सोबले, संजय कावरे, रामदास वाळुंज, विश्वनाथ थोरात, संतोष कावरे, दीपक थोरात, सतीश कावरे, प्रशांत कावरे, बाळासाहेब बुगे, सर्जेराव वाळुंज, पुरुषोत्तम कावरे, मयुर कावरे, ओम कावरे यांच्यासह परिसरातील महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा लोकार्पण सोहळा केवळ ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्याचा नव्हता, तर तो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका संवेदनशील नेतृत्वाच्या कार्याचा होता. सुजित झावरे पाटील यांनी दाखवलेले काम आणि प्रत्यक्ष सहभाग हा इतरांसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने नेतृत्व कसे असावे याचा वस्तुपाठ त्यांनी आज पुन्हा एकदा सादर केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment